राज साहेबांवरील प्रेमाची अनोखी अभिव्यक्ती : आशाराम शेंडगे यांनी काढला ‘राज ठाकरे’ यांचा टॅटू

Spread the love

आळते / प्रतिनिधी 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार आणि नेतृत्वशैलीने प्रभावित होऊन अनेक युवक त्यांच्या विचारांचे समर्थक झाले आहेत.मात्र आळते (ता.हातकणगले) येथील मनसे सैनिक आशाराम बापू शेंडगे यांनी व्यक्त केलेले प्रेम संपूर्ण हातकणगले परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.आशाराम शेंडगे यांनी आपल्या हातावर थेट राज ठाकरे यांचा परमनंट टॅटू काढून घेतला असून दुसऱ्या हातावर ‘शिवमुद्रा’ गोंदवून घेतली आहे.

शेंडगे हे मूळचे बिड जिल्ह्यातील असले तरी कामानिमित्त हातकणगले तालुक्यातील एका कंपनीत मोलमजुरीचे काम करतात. लहानपणापासूनच त्यांना राज ठाकरे यांचे मोठे आकर्षण आहे.त्यांच्या शैलीदार भाषणशैलीपासून ते ठाम भूमिकांपर्यंत सगळ्याच गोष्टींनी प्रभावित होऊन ते आजही राज ठाकरे यांची प्रत्येक सभा,भाषण नियमित ऐकतात.शक्य तेव्हा त्यांच्या जाहीर सभा गाठतात आणि मनसेचा आपल्या परीने प्रचार देखील करतात.

राज ठाकरे यांच्यावरील हे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी नुकताच आपल्या हातावर राज साहेबांचा चेहरा असलेला परमनंट टॅटू गोंदवून घेतला.याचबरोबर दुसऱ्या हातावर शिवमुद्रा सुद्धा कोरली. त्यांच्या या टॅटूची चर्चा सध्या हातकणगले परिसरात जोरात सुरू असून,अनेकजण त्यांना भेटून फोटो काढून घेत आहेत.राज साहेब हे माझे दैवत आहेत.त्यांच्या विचारांवरच मी चालतो.त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचं आहे.मी मनापासून त्यांचा चाहता आहे आणि हीच भावना टॅटूमधून व्यक्त केली आहे,”असे आशाराम शेंडगे यांनी सांगितले.शेंडगे यांचे हे राज प्रेम इतर मनसे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सामान्य कामगार वर्गातही राज ठाकरे यांच्यावरील प्रेम किती खोलवर आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरते.”

error: Content is protected !!