आता तरुण तरुणींच्या रोजगाराबद्दल लढणार – सौरभ शेट्टी

Spread the love

नांदणी / प्रतिनिधी

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद प्रस्तुत ‘मी उद्यमी’ असा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भागातील अनेक तरुण-तरुणी ज्यांना नोकरी व उद्योग करायचे आहे, अशांना एकत्रित बोलवून तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. स्वाभिमानी फूड क्लस्टर नांदणी येथे हा कार्यक्रम पार पडला.

 

सध्याच्या बेरोजगारीचा परिणाम बघता गावातील मुलांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केलेला हा स्तुत्य उपक्रम .मी उद्यमी च्या माध्यमातून भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तरुणांना मनासारखी नोकरी व व्यवसाय आपल्या भागातच राहून करता यावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शेतकरी त्यावेळी सोबतच आता सर्वसामान्य मुलांच्या नोकरीवर रोजगार संदर्भात संपूर्ण स्वाभिमानीची ताकद लावू असे प्रतिपादन सौरभ शेट्टी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी , कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ पुणे समन्वयक उत्कर्ष निकम , सी.एस. प्रवीण नरगचे, टॅक्स कन्सल्टंट राहुल चौगुले व स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!