शिरोळ / प्रतिनिधी
येथील युवा उद्योजक आणि श्री दत्त उद्योग समूह (एस. डी. यु. कन्ट्रक्शन व एस डी यु पावर सोलर) चे प्रमुख विश्वजीत विलास शिंदे यांना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिल या विद्यापीठाच्यावतीने डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
विश्वजीत शिंदे यांनी बिजनेस, ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. केलेल्या कामाची दखल घेऊन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिल या विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. गोवामधील वास्को-द-गामा येथील हॉटेल द ग्रँड फ्लोरा येथे विद्यापीठाचे पदाधिकारी यांच्या हस्ते विश्वजीत शिंदे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.