कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
भादोले – ढाकाळे चांदोली वसाहत (ता.हातकणंगले) येथे भगवान गौतम बुध्दाच्या जयंतीचे औचित्य साधुन बौद्ध विकास मंडळाच्या वतीने नियोजित बुध्द विहाराच्या बांधकामांचे भूमीपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व डॉ.अशोकराव माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सुरेश पाटील,डॉ.जयेश श्रीपती पाटील,मयूर काशिनाथ सोनवणे,अजय उत्तम सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.