पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
गुरुकुल प्रणालीच्या माध्यमातून बालवयातच धार्मिक संस्कार झाले तर भावी सक्षम नागरिक घडू शकतो आणी हे बाल शिबीराच्या माध्यमातून ह भ प आप्पासाहेब वासकर महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करत आहे असे उध्दगार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी शिये ता करवीर येथे सात दिवस सुरू असणाऱ्या बालसंस्कार शिबीराच्या सांगता समारंभात बोलताना व्यक्त केले.पुढे बोलताना म्हणाले कि महाराष्ट्र ही संताची भुमी असून बाल संस्कारातूनच देव,देश,धर्माचे कार्य त्यांच्या हातून व्हावे यासाठी या शिबीराच्या माध्यमातून संतविचार मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहीजे त्यासाठी गुरूकूल सारख्या संस्था राज्यात सुरू केल्या पाहीजेत अशा संस्थांसाठी योग्य प्रस्ताव करून पाठवल्यास सहकार्य केले जाईल अशा संस्था उभा राहणे ही काळाची आणी देशाची गरज आहे असे ते म्हणाले माजी आमदार प्रकाश आवाडे यानी बोलताना म्हणाले कि येणारी पिढी हि वारकरी संप्रदायातील संतांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार, संस्कारक्षम निर्माण व्हावी. त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान निर्माण व्हावा संस्कार शिबिरात दिलेली शिकवणीसह आई वडिलांनी केले संस्कार कधीच विसरू नये म्हणून राज्यात वारकरी पिडी तयार होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रेम , प्रिती , दंडात्मक संस्काराचा अवलंब केला पाहीजे जेणेकरून आपल्या मुलांना कठिण परिस्थितीची जाणीव झाली पाहीजे त्यासाठी आई वडिलांनी आपले मन घट करून त्यांच्यावर योग्य संस्कार केले पाहीजे असे मत अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यानी बोलताना व्यक्त केले व त्यांच्या हस्ते संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.यावेळी संस्कार शिबिरातील मुलानी रामरक्षा स्त्रोताचे पटण केलेयावेळी आम चंद्रदीप नरके यानी नंदवाळ तीर्थक्षेत्रासाठी सहकार्य करावे अशी मागणी शिंदे यांच्याकडे केली .यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर , माजी खासदार संजय मंडलिक , खासदार धैर्यशील माने ,आम राजेश क्षिरसागर , आमदार चंद्रदीप नरके , आमदार अशोकराव माने , कौस्तुभ महाराज वासकर , राहूल वासकर , मंगल गिरी महाराज, वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे , चैतन्य महाराज देऊकर , विठ्ठल महाराज चौरे, बाबा महाराज बडवे , अक्षय महाराज भोसले , भागवत महाराज हांडे , राणा वासकर, उपस्थित होते