दहावीच्या १९९० – ९१ बॅचचा १७ मे रोजी ९ वा ‘मैत्रीचा उत्सव’ (गेट-टुगेदर) सोहळा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

श्री पद्माराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज, शिरोळ येथील इयत्ता दहावी १९९० – ९१ या बॅचचा नववा गेट-टुगेदर सोहळा १७ मे २०२५ रोजी उत्साहात आणि जल्लोषात संपन्न होत आहे. २०१७ पासून सलगपणे सुरू असलेली ही परंपरा आजतागायत कायम असून,वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडतो आहे.या गेट-टुगेदरचे वैशिष्ट्य म्हणजे या बॅचमध्ये समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक दिग्गज एकत्र येत आहेत.राजकारण,समाजकारण, शिक्षण,कृषी,उद्योग,कला,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे या गटाचे सदस्य आहेत.त्यामुळे हा केवळ आठवणींचा कार्यक्रम न राहता,अनुभवांची देवाणघेवाण, प्रेरणादायी संवाद आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाण देणारा एक विधायक मंच बनला आहे.गेली आठ वर्षे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाबुराव पाटील (सर) हे करत असतात.गेट-टुगेदरच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मण भोसले,अशोक माने, दादासो कोळी,पिंटू फल्ले,दीपक गायकवाड,अमर मोरे,धनंजय मुळीक, प्रल्हाद पवार,महावीर पाटील आणि इतर सर्व वर्गमित्र-मैत्रिणी यांनी विशेष परिश्रम घेत असतात.जवळपास ७० ते ८० मित्र – मैत्रिणी दरवर्षी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात,हे विशेष उल्लेखनीय आहे.या उपक्रमाचे एक वेगळेपण म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने आणि सर्वांच्या सहमतीने गेट-टुगेदर आयोजित केला जातो.यामध्ये केवळ मनोरंजनच नव्हे,तर एकमेकांच्या आयुष्यातील यशोगाथा ऐकण्याची, अडचणी समजून घेण्याची आणि एकमेकांना मदतीचा हात देण्याची संधीही मिळते.वर्गमित्र-मैत्रिणींच्या जीवनातील अनुभव,त्यांचे प्रगतीचे टप्पे,आणि सामाजिक योगदान पाहून या कार्यक्रमाचे महत्त्व प्रत्येक वर्षी अधिक वाढत आहे.या बॅचचा हा समूह म्हणजे एक प्रेरणादायी आणि एकात्मिक विचारांचा संगम आहे.जुन्या आठवणींना उजाळा देत,स्नेहबंध दृढ करत आणि सामाजिक भान जागवणारा हा उपक्रम म्हणजे खर्‍या अर्थाने ‘मैत्रीचा उत्सव’ आहे.ही परंपरा पुढील अनेक वर्षे असाच नवनवीन रंग घेत जपली जाईल,असा भावनिक क्षण घेऊन पुन्हा सर्वजण परत आप-आपल्या प्रवासात जात असतात.गेट-टुगेदर म्हणजे या सर्वांना एक ऊर्जा देऊन जात असतो त्यामुळे या गेट-टुगेदरची सर्वच आतुरतेने वाट पाहत असतात असा सोहळा १७ मे रोजी शिरोळ येथील मुळीक फॉर्म हाऊस येथे आयोजित करण्यात आला आहे.

error: Content is protected !!