अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विलासनगर शाळेचा १००% निकाल!

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

 

अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ,राजोपाध्येनगर संचलित माध्यमिक विद्यालय, विलासनगर या प्रशालेने यंदाच्या इ. १० वीच्या एस.एस.सी. परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.परीक्षेला बसलेल्या सर्व ६५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून त्यामध्ये ८ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये किरण पाटील (९४.२०%), भार्गवी लांडगे (९२.४०%), आर्यन कांबळे (९२.२०%), नीरजा निर्मळे (८३.८०%), रिद्धी लंबे (८३.४०%) यांनी घवघवीत यश मिळवले. याशिवाय २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या घवघवीत यशामागे संस्थापक अध्यक्ष एस.एन.पाटील, डॉ. मनोजकुमार पाटील,सचिव सौ.माधवी पाटील, तज्ञ संचालिका सौ.प्रतिभा पाटील, मुख्याध्यापक सी.पी.वाकरेकर आणि सौ.डोईफोडे बी.आर.यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी मार्गदर्शक वर्गशिक्षक मोरे सर,सौ.वाघमारे मॅडम आणि सर्व विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात मार्गदर्शन करून त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांचे शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!