पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
येथील महादेव विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्रकाश कौंदाडे हे होते.
यावेळी बोलताना महाडिक म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे.सर्व सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठे योगदान लाभले आहे.भविष्यात शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना सहकारी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन महाडिक यांनी केले.
स्वागत प्रस्तावित करताना संस्थापक अध्यक्ष प्रकाश कौंदाडे यांनी संस्थेच्या माध्यमातून सभासदांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा तसेच उलाढालीचा आढावा घेतला.
याप्रसंगी सरपंच सौ.पद्मजा करपे, माजी सरपंच शशिकांत खवरे,कमल कौंदाडे, सुजाता पाटील, मनिषा संकपाळ, उत्तम पाटील,उपसरपंच बाजीराव पाटील, केडीसी बॅंक निरीक्षक तेली.शाखा व्यवस्थापक शंकर पाटील, सचिन शेटे, दिलीप पाटील, मामा पाटील, सुरेश पाटील,राजू सुतार, नारायण मोरे,बंडा जाधव, एकनाथ संकपाळ, धनाजी पाटील,सलीम महात, सदाशिव संकपाळ, कृष्णात करपे, योगेश खवरे, विठ्ठल पाटील, संतोष पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
चौकट
महादेव विकास सोसायटी हि स्वताच्या जागेत व प्राॅपर्टी कार्ड निघणारी एकमेव संस्था ठरली आहे.पण गावातील अनेक संस्था या तलावाच्या काठावर गावठाण जागेवर उभारल्या आहेत.