विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या शिरोळ तालुका कार्यकारिणीची निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

विश्व हिंदू परिष बजरंग दलाच्या शिरोळ प्रखंड(तालुका) व खंड नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हा मंत्री सुजित कांबळे,बजरंग दल जिल्हा संयोजक अमित कुंभार,धर्मचार्य संपर्कप्रमुख अमोल शिरगुप्पे यांच्या उपस्थितीत शिरोळ तालुका नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

 

शिरोळ तालुका कार्यकारणीमध्ये पिंटू संकपाळ यांची विहिप शिरोळ प्रखंड अध्यक्ष,रणधीर जगदाळे यांची विहिप शिरोळ प्रखंड मंत्री,अक्षय हेरवाडे यांची शिरोळ प्रखंड बजरंग दल संयोजक,ओंकार माने यांची शिरोळ प्रखंड बजरंग दल सहसंयोजक,संदीप गावडे यांची शिरोळ प्रखंड बजरंग दल गोरक्षक या पदावर निवड करण्यात आली आहे.

 

 

त्याचबरोबर अमित क्षीरसागर यांची शिरोळ खंड विहिप मंत्री, प्रणेश भोसले यांची जयसिंगपूर खंड बजरंग दल संयोजक, दीपक बगाडे यांची टाकवडे खंड बजरंग दल संयोजक,विनायक कदम यांची टाकवडे खंड बजरंग दल सहसंयोजक,स्वरूप सुतार यांची दत्तवाड खंड बजरंग दल संयोजक पदी निवड करण्यात आली.

 

 

यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे सर्व प्रमुख पदाधिकारी व बजरंगी उपस्थित होते.नूतन कार्यकारणीचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!