तुम्ही आमच्या कुटुंबाची आणि गावची काळजी घ्या – CISF जवान प्रशांत पुजारीचे भावनिक आवाहन 

Spread the love
माजी सैनिकांनी आमच्यावर तरुण सैनिकांवर विश्वास ठेवावा.आम्ही सीमेवर खंबीरपणे उभे आहोत.तुम्ही आमच्या कुटुंबाची आणि गावाची काळजी घ्या,बाकी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.अशी प्रतिक्रिया शिरोळचे सुपुत्र व सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये कार्यरत असलेले जवान प्रशांत पुजारी यांनी आज सत्कार प्रसंगी माजी सैनिकांना केले आहे.भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या अड्ड्यांचे मोठ्या प्रमाणावर उध्वस्त करण्याचे सुरू आहे. देशभरातून जवानांच्या धाडसाचे व कौशल्याचे कौतुक होत असून माजी सैनिकही युद्धात सहभागी होण्यासाठी पुढे सरसावले त्यांचे कौतुक ही प्रशांत पुजारी यांनी केल आहे.पुढे बोलताना पुजारी म्हणाले, “पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.आम्ही सर्व जवान त्याचे स्वागत करतो.या वेळेस ठाम निर्णय घेऊन दहशतवाद कायमचा संपवावा.वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना आता पूर्णविराम मिळायलाच हवा असे शेवटी पुजारी म्हणाले. दरम्यान प्रशांत पुजारी यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांचे गाव, कुटुंब व जिल्ह्याला अभिमान वाटत आहे.त्यांच्या देशभक्तीने अनेक तरुणांमध्ये जोश निर्माण झाला आहे.सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल उंचावणाऱ्या अशा प्रतिक्रियांमुळे संपूर्ण देश एकजूट होऊन आपल्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचे मत माजी सैनिकांनी व्यक्त केले आहे.
error: Content is protected !!