कर्तव्यावर जाणाऱ्या शिरोळच्या CISF जवान प्रशांत पुजारी यांच्या माजी सैनिकांच्यावतीने सत्कार

Spread the love
पाकिस्तानकडून भारतावर थेट युद्ध लढण्याची हिंमत नसल्यामुळे ते दहशतवाद्यांमार्फत भ्याड हल्ले करत आहेत.मात्र भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या मोहिमांद्वारे अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.याचा सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी आज शिरोळ व्यक्त केले.CISF मध्ये गेली सोळा वर्षे देशसेवा करणारे शिरोळचे सुपुत्र प्रशांत चंद्रकांत पुजारी हे दोन दिवसांपूर्वीच सुट्टीवर घरी आले होते.मात्र 7 मेपासून भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने सर्व जवानांना सुट्ट्या रद्द करून तत्काळ सेवेत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे दोन दिवसांपूर्वी गेलेले सचिन माने,शरद कांबळे व आज हे आपले कुटुंब सोडून आज रात्री गोवा एक्सप्रेसने पुन्हा सेवेसाठी रवाना होणार आहेत.
त्यांच्या या देशभक्तीला आणि त्यागाला शिरोळ गावाच्या वतीने गौरवण्यात आले.शिरोळ तालुका आजी-माजी सैनिक सेवा संस्था आणि कोल्हापूर सैनिक फेडरेशनच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,फेडरेशन अध्यक्ष संजय माने,सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय इंगळे,संरक्षण समिती सदस्य शहाजी काळे,सचिव शंकर मेथे,उपाध्यक्ष मोहन कोगे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. देशासाठी कुटुंबाला सोडून रणभूमीकडे निघालेल्या प्रशांत पुजारी यांच्या सेवाभावाला उपस्थितांनी सलाम केला.शिरोळ ग्रामस्थांना आपल्या सुपुत्राचा अभिमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी माजी सैनिक दगडू कांबळे, रमेश काळे,संभाजी गावडे,हरि धुमाळ,रामदास मराठे, निवृत्ती सूर्यवंशी,शिवाजी कांबळे,पोपट कांबळे,अरविंद माळगे,बापूसो मुल्ला,सुधाकर आरदाळे,साहेबलाल पकाले,पांडुरंग घाडगे,संपत इंगळे यांच्यासह अनेक आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!