मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अन्य एका वाहनास धडक देवून ट्रक सेवा रस्त्यावर पलटी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील महाडिक पेट्रोल पंम्पासमोर मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अन्य एका वाहनास धडक देवून ट्रक सेवा रस्त्यावर पलटी, सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने जिवीत हानी होण्यापासून टळली, दोन्ही वाहनांचे लाखोचे नुकसान.

शिरोली पुलाची येथील महाडीक पेट्रोल पंम्पासमोर आज दुपारी दिड वाजण्यासुमार पुणे चाकण येथून अन्य कंपनीचा माल घेवून बेळगावकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एच २३ ऐ यु ५९०९ चा ब्रेक अचानक निकामी झाल्याने समोरील वाहनास धडक देवून ट्रक हावेचे लोखंडी बॅरिकेट तोडून १० फूट खाली सेवा रस्त्यावर येवून पलटी झाला . आज दुपारी सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठी जिवीत हानी होण्यापासून टळली मात्र या अपघानाने हायवेवर व सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटनास्थळी आमदार अमल महाडिक यांनी भेट देवून अपघाताविषयी माहिती घेत ड्रायव्हरची विचारपुस केली व शिरोली पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली .

error: Content is protected !!