टँकर ट्रकची मालवाहू रिक्षास धडक,बत्तीस शिराळा तालुक्यातील रिक्षा चालक जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर जंगदब टाईल्स समोर टँकर ट्रकची मालवाहू रिक्षास धडक दिल्याने बत्तीस शिराळा तालुक्यातील रिक्षा चालक जागीच ठार हा अपघात सांगली फाटा मार्बल लाईन येथे घडला.पो लिसातून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर जंगदब टाईल्स येथे मयत अरूण शिवाजी पाटील ( रा बिऊर ता बत्तीस शिराळा जि सांगली ) हे टाईल्स खरेदी करण्यासाठी दुपारी आले होते.टाईल्स खरेदी करून आपल्या रिक्षा क्रमांक एम एच १० सी क्यू ३७१९ ने गावी जात असताना रस्ता ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना सांगलीकडे जाणाऱ्या टँकर ट्रक क्रमांक एम एच १३ ई पी १००६ ने जोराची धडक दिल्याने टाईल्स भरलेली रिक्षा पलटी होऊन रिक्षाखाली अरूण पाटील हे अडकल्याने त्यांचा उपचारादर्म्यान मृत्यू झाला हा अपघात आज बुधवारी ४:३० वाजण्यासुमार झाला असून या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसात झाली आहे.मृत अरुण शिवाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,दोन मुले असा परिवार आहे.

error: Content is protected !!