पत्रकारितेचा पाया म्हणजे सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक भान – डॉ. खानाज यांचे प्रतिपादन

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

“पत्रकार केवळ बातमी देत नाही, तर समाजाच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षा मांडतो. भाषिक कौशल्य, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि विवेकी दृष्टिकोन ही आजच्या पत्रकाराची गरज आहे. योग्य पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य बाळगते,” असे प्रतिपादन नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज यांनी केले.

 

देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.एम.सी.जे. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘मुक्त विचार’ या प्रायोगिक अंकाचे प्रकाशन आणि एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. खानाज यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत पंडित कोंडेकर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून वृक्षाला पाणी घालण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी बोलताना पंडित कोंडेकर म्हणाले, “पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी भाषिक क्षमता आणि चिंतनशील दृष्टिकोन आवश्यक आहेत. प्रभावी लेखन आणि संवाद वाचकांशी नाते निर्माण करतात. वस्तुनिष्ठता आणि सखोल विश्लेषणामुळे पत्रकारिता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनते.कार्यक्रमाचे स्वागत सूरज नदाफ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक ‘मुक्त विचार’चे संपादक जमीर पठाण यांनी सादर केले.

 

कार्यक्रमात डॉ. रामेश्वर संपकाळ, प्रा. एफ. एन. पटेल, पत्रकार दयानंद लिपारे, सतीश महाकाळे, माजी नगरसेविका आसमाबी मुजावर, प्रा. शारदा पाटील, डॉ. बिरनाळे, प्रा. अर्जुन पाटील, निकेतन कांबळे, नीता पाटील, सुनीता डिग्रजे-पाटील, डॉ. संदेश पाटील, प्रशांत कांबळे, सद्दाम-हुसेन मुल्ला आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी शहाहुसेन मुल्ला, प्रदीप थोरात, अरमान नसरदी, रूकैय्या मुजावर, मयूर चिंदे, दिलीप शिरढोणे, मेहबूब मुजावर यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आभार ऋषिकेश जगताप यांनी मानले

error: Content is protected !!