पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये वीरशैव लिंगायत समाज पुलाची शिरोली यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन पुलाची शिरोली येथील लिंगायत समाज यांच्या वतीने करण्यात आले होते.अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते.साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात,अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे अवचित्य साधन पुलाची शिरोली येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये आकर्षक फुलांनी सजावट केलेल्या मंडपामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे सकाळी दहा वाजता पूजन त्यानंतर अकरा वाजता भजनाचा कार्यक्रम करण्यात आला.दुपारी बारा वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्याचे पूजन करून श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्म काळ साजरा करण्यात आला तसेच यावेळी महिलांनी पाळणा गीते गाईली त्यानंतर दुपारी 12:30 वाजता लिंगायत समाजाच्या वतीने तीर्थप्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी बाजीराव पाटील उपसरपंच शिरोली ग्रामपंचायत,मधुकर पदमाई,बाळू सोडगे ,उत्तम पाटील महाराज,अरुण सोडगे,उद्योजक उदय खटाळे,निशिकांत पद्माई,चंद्रकांत खटाळे ,संजय खटाळे,संतोष सातपुते,अक्षय खटाळे,भगवान विभुते,सूर्यकांत खटाळे,शिवप्रसाद खटाळे, स्वप्निल लंबे,धैर्यशील माळी,प्रमोद माळी
समस्त लिंगायत समाज भगिनी उपस्थित होते.