तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश 

Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या अकरा विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र ,तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात ,उत्तर प्रदेश ,केरळ कर्नाटक आदि राज्यांनी सहभाग नोंदवला होता
यामध्ये तब्बल अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच जयसिंगपूर मधील तेज रोलर स्केटिंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत रोलर रिले स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवलेली आहे कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला हा पहिलाच मान आहे.श्लोक कोळी,आदित्य पाटील,अक्षत खामकर,अधिराज खरात,पियुष रणशूर,प्रणील सायजू व्ही व्ही,वेदांत वासुदेव,निवेदिता शिंदे,स्वरा किनीकर, नमित किनिकर,रवीतेज वैद्य या सर्व विद्यार्थ्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तसेच या विद्यार्थ्यांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,माजी नगरसेवक राहुल बंडगर, माजी नगरसेवक दादासो पाटील चिंचवडकर, व आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!