कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या यशस्वी व उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना “विशेष पोलीस महासंचालक पदक” जाहीर झाले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस हे गेल्या काही वर्षांपासून पोलिस दलात आपल्या कर्तव्यनिष्ठतेने आणि प्रामाणिक सेवेमुळे ओळखले जात आहेत. त्यांनी गुन्हेगारी घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवणे, सामाजिक सलोखा राखणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे या बाबतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कुरुंदवाड परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यात फडणीस यांची भूमिका मोलाची राहिली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे, अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करणे आणि तरुणांना गुन्हेगारी पासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे या क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठ्या कारवाया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.या सर्व उल्लेखनीय सेवेमुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिस खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत, विशेष पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांचा सन्मान केला आहे. हे पदक पोलीस खात्यातील एक अत्यंत मानाचे पारितोषिक मानले जाते, जे केवळ उत्कृष्ट सेवा व कार्यक्षमतेसाठी दिले जाते.
सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले.सहाय्याक पोलीस निरीक्षक – फडणीस
“हे पदक मला मिळाले असले तरी हे फक्त माझे वैयक्तिक यश नाही, तर माझ्या सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे आणि कुरुंदवाडकर जनतेचे सहकार्य आणि प्रेम यामुळेच शक्य झाले आहे,” असे रविराज फडणीस यांनी भावनिक शब्दांत सांगितले.