पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांचे विचारच आणि संस्कारच देशाला बलशाली बनवू शकतात असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले.ते पुलाची शिरोलीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.सरपंच सौ.पद्मजा करपे व माजी सरपंच शशिकांत खवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.भिडे गुरुजी पुढे म्हणाले शिरोलीत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीच्या रुपाने विलक्षण संदेश भारताला देण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच सर्वांना दिशा दर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सरपंच सौ.पद्मजा करपे,माजी सरपंच शशिकांत खवरे या दोघांचाच सत्कार संभाजीराव भिडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास उपसरपंच बाजीराव पाटील,उद्योजक राजू पाटील,रावसाहेब देसाई,महेश चव्हाण,पंडित खवरे,उत्तम पाटील,कृष्णात करपे,अनिल खवरे, प्रकाश कौंदाडे,सरदार मुल्ला,सलीम महात,मुन्ना सनदे,बी.टी.देशमुख,राजेश पाटील,विजय जाधव,बाळासाहेब पाटील,धनाजी पाटील,योगेश खवरे,रणजित कदम,उत्तम पाटील,विनोद आंची, अविनाश कोळी, बाजीराव सातपुते,बाबासाहेब कांबळे, राजेंद्र सुतार,संतोष बाटे,संपत डांगे, महंमद महात, रणजित केळूस्कर, शिवाजी समुद्रे, सतिश रेडेकर, मुकूंद नाळे आदीसह गावातील सर्व समाजातील तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला- भगिनी तसेच कमान उभी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाहक सुरेश यादव, नितीन चव्हाण, अर्जुन चौगुले, संग्राम चौगुले तसेच सर्व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रस्तावित धारकरी नितीन चव्हाण यांनी केले.आभार अर्जुन चौगुले यांनी मानले.सुञ संचलन सुहास भोसले यांनी केले.