हातकणंगले / प्रतिनिधी
येथील रेणूका माता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा,कलशारोहन व वास्तुशांतीच्या निमित्ताने काल २५ रोजी मुहर्तमेढ, मंडपपूजन, जातीपुजन आणि सुहासिनी पुजनाचा कार्यक्रम सौ.व श्री.रंगराज सुदेश मोरे ,सौ. व श्री . आण्णाप्पा देवापा खोचगे आणी सौ. व श्री. दिलिप शिवगोंडा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
दुपारी सुदेश मोरे व प्रदीप खोचगे यांच्या शुभहस्ते मुर्ती प्रदक्षिणा पार पडली. तर रात्री नवीन मुर्ती स्थापना करण्यात आली. या निमित्ताने बुधवारी ता . ३० रोजी धार्मिक विधी ,हवनपुजन,गणेश पुजन,पुण्याह वाचन ,नवग्रह पुजन , गंगापुजन , आणि अभिषेक संपन्न होणार आहेत . तर गुरुवार ता .8 मे रोजी जग भरणीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास गुरुवर्य रंजीता नायक ,जरीना नानी,मनिषा मम्मा,तसेच मधू आई जाधव, महादेव शिवाचार्य महाराज ,माजी आमदार प्रकाश आवाडे ,आ. राहूल आवाडे,आमदार अशोक माने,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले, माजी सरपंच संदीप कारंडे ,माजी सरपंच अजित पाटीलआदि उपस्थित राहणार असून सौ श्वेता व विश्वविजय सुदेश मोरे यांच्या शुभहस्ते महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सर्व सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहान शाहू कॉर्नर व वेताळ चौक हातकणंगले यांनी केले आहे .