पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
लग्नाचे खोटे आमिष दाखवून पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याने माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना राधानगरी तालुक्यातील इस्पुर्ली येथील असून पिडीत महिलेवर चार महिन्यांच्या तिन वेळा अत्याचार केल्याचे पिडीत महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले आहे . आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही दोन्ही बाजू राजकीय असल्याने पोलिसांना आपली भुमिका बजाविण्यात अपयशाचा सामना करावा लागत आहे.
राधानगरी तालुक्यातील इस्पुर्ली गावातील पिडीत महिलेचा जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाशी चार महिन्यापुर्वी ओळख होऊन तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर चार महिन्यात वारंवार शरिर संबंध ठेवून अत्याचार केला पिडीत महिलेने लग्नाबद्दल विचारणा केल्यावर तीला आरोपी हा उडवाउडवीची उत्तरे देवून तिला टाळत होता आपल्याला लग्नाचे खोटे आमिष दाखवून आपला वापर केला असून आपली आरोपीने फसवणूक केली आहे त्यानुसार पिडीतीने शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आरोपी ही पेशाने वकिल असून तो राजकीय घराण्याशी संबंधित असल्याने राजकीय दबावाचा वापर करून हे प्रकरण प्रसार माध्यमापासून दडपण्याचा प्रकार केला जात आहे.आरोपी याने चार महिन्यात प्रथम तिला शिरोली सांगली फाटा येथील शिवतारा हाॅटेलवर आनूण तिच्यासोबत लैंगिक संबंध केले त्यानंतर कोल्हापूरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात असणार्या भक्त यात्री निवासात हि वारंवार अत्याचार केला आहे.
आरोपी अध्यापही फरार असून पोलिस त्याचा तपास घेत असल्याची माहिती समोर येत आहे पण राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांच्यावर दबाव येत असला तरी पोलिसांनी आपली भुमिका बजावली पाहीजे.