पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
यासाठी मातीचा भराव करताना,पर्यावरणाचा विचार करणे, गुणवत्ता योग्य ठेवणे, आणि अनधिकृत कामांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक अशी नियमावली असताना मात्र नागाव फाटा येथील पुलाच्या (ब्रीज) दोन्ही भिंतीमध्ये फौंड्री वेस्ट सँडचा भराव टाकून ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला जवळपास हजारो कोटींचा अनपेक्षित खर्च केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.या खर्चा प्रमाणे त्याच्या कामाची गुणवत्ताही त्याच पद्धतीने असली पाहीजे येणेकरून भविष्यात लोकांना प्रवासामध्ये अडथळे निर्माण होऊ नये याची दखल घेणे गरजेचे आहे.
हातकणंगले तालुक्यातील नागाव फाटा येथील चौक हा अपघाताचा केंद्र बिंदू असल्याने येथे मोठा उड्डाण पुल ( ब्रीज ) झाला पाहिजे हि परिसरातील नागरिक व राजकीय नेते मंडळींकडून याबाबत अनेकदा शासन दरबारी मागणी केली जात होती या मागणीला यश प्राप्त होऊन या ठिकाणी मोठ्या उड्डाण पुलास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून मान्यता मिळून येथे उड्डाण पुलाच्या कामास सुरूवात झाली .
पण हे काम गेल्या कित्येक महिन्यापासून संथगतीने सुरू आहे पण या कामात मात्र ठेकेदाराकडून गुणवत्ता दिसून येत नाही .फौंड्रीतील कास्टिंगच्या धगीने जळून खाक झालेली वेस्ट सँड या उड्डाण पुलाच्या भरावत वापरली जात आहे . फौंड्रीत कास्टिंग काढण्यासाठी या सँडमध्ये अनेक प्रकारचे केमिकल वापरले जाते त्यानंतर या सँडमध्ये भट्टीतील रस (मेटल) ओतल्याने ही सँड केमिकलमुळे जळाल्याने यातील मजबुतीकरण नष्ट होऊन ती एका राखेत रूपांतर होते त्यामुळे या मातीचा वापर करणे टाळला जातो पण या ठेकेदाराकडून मात्र याचा विचार न करताच होत आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत .
हा भराव उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस २५ ते ३० फुटाची डिझाईनमध्ये असेल्या सिमेंट विट्टांची भिंत बांधून त्यामध्ये हा भराव टाकला जात आहे . विट्टाना खिडक्या असल्याने भविष्यात वाढती रहदारी व नैसर्गिक आपत्तीमुळे भरावास टाकलेली वेस्ट सँड ही ढासळून बाहेर येण्याची दाट शक्यता असल्याने मोठी दुर्घटनाही होऊ शकते .
राष्ट्रीय महामार्गावर मातीचा भराव करणे हे रस्ता बांधणी, रुंदीकरण आणि इतर कामांसाठी मातीचा भराव करताना, पर्यावरणाचा विचार करणे, गुणवत्ता योग्य ठेवणे, आणि अनधिकृत कामांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मातीचा भराव करताना, पर्यावरणाचा विचार करणे नैसर्गिक परिस्थितीचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.