पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे लोटस फर्निचर शेजारी दारूच्या नशेत पडलेल्या ३७ तरूणाचा मृत्यू झाला . मयत तरूणाचे नाव प्रविण प्रताप स्वामी ( रा. राजारामपुरी कोल्हापूर ) असे असून तो व्यसनाधीन होता त्याचे व्यसन सोडवण्यासाठी त्याला काही दिवसापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते तेथून तो घरी आल्यावर त्याने परत दारू पिण्यास सुरू केली होती . तो दारू पिऊन पुलाची शिरोली येथे शनिवारी पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .
हा मृतदेह नेण्यासाठी १०८ अँम्बुलंनस मागवली पण ही आलेली अँम्बुलंनस चालकाच्या चुकीने शेतात शिरली पण ती अँम्बुलंनस बाहेर काढणे मुश्किल झाले जवळ जवळ तास दीड तास अडकून पडल्याने दुसरी अँम्बुलंनस मागवावी लागली. मग प्रविण याचा मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सिपीआर हाँस्पीटल येथे नेला.