चकर येवून डिव्हाडर वर पडल्याने ६० वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

चकर येवून डिव्हाडर वर पडल्याने ६० वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला हि घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या एमआयडीसी पहिला फाटा येथील सेवा रस्त्याच्या बाजूस घडली आहे पण तिला झालेल्या जखमीवरून तिचा घातपात झाली अपघात हे अद्यापही अस्पष्ट ?

शिरोली एमआयडीसी पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि एमआयडीसी पहिला फाटा येथील जलाराम सिरॅमिक्स शोरूमच्या बाजूस असणार्या रिकाम्या जागेत शिरोली येथील मयत मुक्ताबाई मारूती गोरे यांचा मृतदेह आज सकाळी १० वाजण्यासुमार निदर्शनास आला गोरे याना शुगरचा त्रास असल्याने दोन दिवसापासून आजारी होत्या त्या दररोज

रूग्णालयात उपचारासाठी जातो असे शेजाऱ्यांना सांगून घराबाहेर पडल्या पण त्या घरी गेल्या नाहीत त्यांचे मानसिक संतुलन हि बिघडले असल्याने त्या आपल्या विचारात असायच्या आज पहाटे रस्त्यावरून जात असताना त्यांची शुगर कमी झाल्याने त्या रस्त्याच्या डिव्हाडरवर चकर येवून पडल्याने त्यांच्या डोक्यात व डोळ्यास गंभीर मार लागल्याने त्या स्वतःहून रस्त्याच्या कडेला जावून पडल्या व तिथेच त्यांचा मृत्यू झाला . गोरे यांच्या अंगावरील जखमा पाहून तिचा खून झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असता त्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले पण श्वान तिथे घुटमळे

गोरे या मुळच्या पुणे जिल्ह्य़ातील असून त्या शिरोली येथे विट भट्टीवर कामानिमित्त ३० वर्षापासून आपल्या पतीसोबत राहत होत्या काही वर्षापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले त्याना आपत्य नसल्याने त्या एकट्याच शिरोली येथे मिळेल ते काम करून राहत होत्या या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .

error: Content is protected !!