शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील प्रसाद कदम,अभिजीत कदम या कदम बंधूंनी आपले वडील स्व.सुनिल कदम यांच्या स्मरणार्थ वेशेतील हनुमान मंदिरासाठी भव्य हनुमान मूर्ती बुधवारी अर्पण केली.यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीची विधीवत पुजा-अर्चा करुन मुर्तीची गावातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, या मूर्तीचा लोकार्पण सोहळा श्री हनुमान जयंती दिवशी शनिवार दि. १२ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे.
येथील स्व.सुनिल कदम यांची श्री हनुमान मंदिरावर भव्य हनुमानाची मूर्ती असावी अशी इच्छा होती.ती इच्छा त्यांनी आपल्या कुटूंबियांकडे बोलून दाखवली होती.परंतू काही दिवसांपूर्वीच त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र प्रसाद कदम,अभिजीत कदम यांनी सदर हनुमान मूर्ती कारागिरांकडून तयार करुन घेतली होती.ती मूर्ती बुधवारी मंदिर समितीकडे अर्पण करण्यात आली.तत्पूर्वी,मुर्तीची पूजा करुन ढोल-ताशे आणि टाळ मृदुंगाच्या निनादात गावातील मुख्य मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.तसेच भाविकांचा मोठा उत्साह आणि भक्तीमय वातावरण दिसून आले.सदर मूर्तीचे लोकार्पण हनुमान जयंती दिवशी करण्यात येणार आहे या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
श्री हनुमान मूर्तीच्या शोभा यात्रेवेळी य माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,राहुल यादव,शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,