खोची येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात सीसीटीव्ही व दानपेटी बसवण्यावरून तुंबळ हाणामारी

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

हातकणंगले तालुक्यातील खोची इथं श्री भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत आहे. चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. ही यात्रा आता चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन दिवसांपूर्वी मंदिरामध्ये सीसीटीव्ही व दानपेटी बसवण्यावरून गुरव समाज आणि कमिटी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. आणि या वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले होते. दोन्ही बाजूची लोक तक्रार दाखल करण्यासाठी पेटवडगाव पोलीस ठाण्यात गेले होते. पण आपापसामध्ये वाद मिटल्याने कारवाई थांबली . मंदिरातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणेवर वरिष्ठ कार्यालयातून संबंधितावर कारवाई आदेश आल्याने यंत्रणा कारवाईसाठी धावपळ करू लागली. पेटवडगाव पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले .

error: Content is protected !!