पुलाची शिरोली / प्रतिनीधी कुबेर हंकारे
हातकणंगले तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० सालासाठी हातकणंगले तहसिलदार कार्यालयात आरक्षण प्रक्रीया पार पडली .सहा वर्षीय सईफ इकबाल शेख याच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले .हातकणंगले तालुक्यात सोनार्ली या पुनवर्सीत गावाची भर पडली असून ग्रामपंचायतींची संख्या ६१ इतकी झाली आहे
हातकणंगले तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायत साठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती , नागरीकांचा मागास प्रवर्ग , सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती , जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रीया व सर्वसाधारण स्त्रीयांची पदे यासाठी आरक्षण तहसिलदार सुशिल बेल्हेकर , अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने , नायब तहसिलदार संदीप चव्हान , संजय पुजारी , माधव इगवे यांच्या उपस्तीतीत आरक्षण सोडत प्रक्रीया पार पडली .
यामध्ये अनु जाती स्त्री ७ , अनु जाती ०६ , अनु जमाती स्त्री ०१ , ना मा प्रवर्ग स्त्री ०८ , ना मागास प्रवर्ग o६ , सर्वसाधरण १५ , सर्व साधारण स्त्री १६
गांव व सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाने
अनु . जाती स्त्री -मौ सोनार्ली , माणगांव , जंगमवाडी , कासारवाडी, निलेवाडी , अंबपवाडी ,
अनु. जाती प्रवर्ग – अतिग्रे , संभापूर , बिरदेववाडी , माणगांववाडी , लक्ष्मीवाडी , कापूरवाडी ,
अनु.जमाती प्रवर्ग : हिंगणगांव
ना मा प्रवर्ग स्त्री – कोरोची , साजणी , तळंद.गे , कीणी , मण पाडळे , तिळवणी , जुने पारगांव , आळते
ना मा प्रवर्ग – रांगोळी , रूकडी , पाडळी , नवे पारगांव , शिरोली , इंगळी , पट्टणकोडोली , वाठार तर्फ वडगांव
सर्वसाधारण : अंबप , भेंडवडे , भादोले , घुणकी , नरंदे , नागांव , मौजे वडगांव , कुंभोज , मजले , रेंदाळ , तारदाळ , चंदूर , दुर्गेवाडी , रूई , मिणचे , वाठार तर्फ उदगांव
सर्वसाधारण स्त्री – चोकाक ,चावरे , हेरले , सावर्डे , तळसंदे , टोप , माले , मुडशिंगी , खोतवाडी , कबणूर , लाटवडे , यळगुड , नेज , तासगांव , खोची , हालोंडी