पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोलीत तरुणाची आत्महत्या

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोली येथे तरुणाने आत्महत्या केली. अभिजीत दत्तात्रय माने ( वय ३८, रा. एकता कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, अभिजित माने हा सध्या फॅब्रिकेशन चे काम करत होता. फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर असल्यामुळे तो पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो पुलाची शिरोली येथे घरी आला होता. पण त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वादाच्या घटना घडत होत्या. दररोजच्या या ञासाला कंटाळून पत्नी माहेरी गेली असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते.शनिवारी दुपारी घरी बिर्याणी करीत असताना अभिजितने पत्नीला व्हिडिओ काॅल केला. तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार असे त्याने पत्नीला सांगत होता. हे सांगत असतानाच बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला.व प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.या घटनेची नोंद राञी उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

error: Content is protected !!