नऊ वर्षांच्या किरणची अनवाणी शिरोळ ते पंढरपूर पायी दिंडी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

चैत्र महिन्यात सुरू होणाऱ्या पंढरपूर वारकरी वारीचे महत्त्व प्रत्येक भक्ताच्या हृदयात असते.याच वारीत नऊ वर्षांची कु.किरण लक्ष्मण सतगे रा.नमाजगे माळ (शासकीय आयटीआय) पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी शिरोळ ते पंढरपूरच्या पायी दिंडी सोहळ्यात अनवाणी सहभागी झाली.चटके देत असलेल्या रखरखत्या उन्हात,पायामध्ये चप्पल घालून नाही तर अनवाणीच वारीत सामील झाली.नवा उत्साह,नवा प्रेरणादायक संदेश घेऊन चैत्र वारीत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक भक्त एकत्र येतात.पण वेगळं उदाहरण ठरली ती नऊ वर्षांची कुमारी किरण शिरोळ ते पंढरपूरपर्यंतचा मार्ग १४० किमीपेक्षा जास्त अंतर आहे. कुमारी किरण आपल्या अनवाणी पायांनीच या दिंडीमध्ये सहभाग घेतला.त्यावेळी ती ज्या पद्धतीने चालत होती.ते पाहून उपस्थित सर्व गावातील नागरिक आश्चर्यचकित झाले. किरण हिने वयाच्या पाचव्या वर्षापासून पंढरपूर आदमापुर बाळूमामा यासह परिसरातील अनेक पायी दिंड्या विना चप्पल आणि आनवाणी पायाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.भर उन्हात चालत जाताना किरण म्हणाली पंढरपूरचे पांडुरंग माझ्या हृदयात आहेत.माझ्या पायांना चटके लागत असले तरी मी भक्तिरसात रंगली आहे आणि त्या दिव्य दर्शनासाठी मी कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाही,” असे किरणने सांगितले.किरणच्या ध्येयाचे सर्व भक्तांना श्रद्धा आणि भक्तीला कोणतीही अडचण थांबवू शकत नाही.तिच्या या कृत्याने तिच्या कुटुंबाला आणि समाजाला एक प्रेरणा दिली आहे.या वारीमध्ये ती अनवाणी चालत असताना तिच्या पायांना होणारा त्रास देखील तिला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या दिव्य चरणांतून एक आनंददायक अनुभव वाटत होता.

error: Content is protected !!