नागाव येथे ५ ते ६ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

नागाव ता हातकणंगले येथे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सनी स्पोर्ट्स मंडळाने ३५ व ६० किलो वजनी गटात ही स्पर्धा आयोजित केली आहे ही स्पर्धा नागाव येथील कन्या शाळेच्या पटांगणात होणार असून ३५ किलो गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ११००० , द्वितीय क्रमांक ७००० , तृतिय क्रमांक ५००० व ६० किलो गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस २१००० , द्वितीय क्रमांकाचे १५०००, व तृतीय क्रमांकाचे ११००० असे असून सर्व संघ हे निमंत्रीत असून ही स्पर्धा शनिवार ५ व रविवार ६ रोजी पार पडणार आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघानी अधिक माहितीसाठी माणिक सावंत ,संतोष घाटगे , सतीश ऐतवडे , अमोल हराळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

error: Content is protected !!