ममदापूर ते पंढरपूर पायी दिंडीचे शिरोळात स्वागत, अखंड 19 वर्ष पायी दिंडीचे आयोजन

Spread the love
टाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठलनामाच्या जयघोषात ममदापूर येथील पायी दिंडीचे रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.या दिंडी सोहळ्याचे यंदाचे 19 वे वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांमध्ये उत्साह वाढत असून दिंडीत येणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे.पायी दिंडीचे शिरोळ येथील जनता हायस्कूल येथे ह भ प हणमंत इंगळे यांनी स्वागत केले.मोहन यादव व परिवाराच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम…असा जयघोष करत दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.या पायी दिंडीत विठुनामाचा गजर करीत वारकरी चालत असतात.यामध्ये त्यांना ऊन पाऊस याची कसलीही पर्वा नसते.सारा भार विठ्ठलावर ठेवून अगदी आनंदाने हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने रोज ठराविक अंतर मार्गस्थ होतात.पंढरपूरच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये एक वेगळाच अनुभव आणि आनंद मिळतो असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळेच अलीकडे गावागावातूनही पायी दिंड्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
error: Content is protected !!