शिरोळ येथील भारतीय सैन्य दलातील जवान सुरज भारत पाटील यांचा मथुरा उत्तर प्रदेश येथे सेवा बजावत असताना मृत्यू झाला.जवान सुरज यांचे पार्थिव सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिरोळ येथे येणार असून शिरोळ येथील जगदाळे वैकुंठधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.जगदाळे वैकुंठधाम येथे शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता,मंडप,पार्थिव दर्शनासाठी स्टेजची तयारी पूर्ण केली आहे.सोमवारी सकाळी पोलीस ठाणे येथे पार्थिवाचे आगमन होईल.त्यानंतर जयभवानी मंडळ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक,जय महाराष्ट्र मंडळ, एस.टी स्टँड मार्गे,अजिंक्यतारा मंडळ ते शहीद सूरज पाटील यांच्या निवासस्थानी दर्शन त्यानंतर कुंभार गल्ली,लक्ष्मी मंदिर,बाजारपेठ,बाल शिवाजी मंडळ, ब्रम्हणपुरी,गावडे गल्ली कोपरा,दत्त मंदिर,जैन बस्ती, भाजी मंडई,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंहवाडी रोड मार्गे वैकुंठ धाम शिरोळ असे मार्ग असणार आहे.जवान सुरज पाटील यांच्या निधनामुळे शिरोळ शहर बंद ठेवण्यात येणार आहे.