“गावगाडा ” या राज्यस्तरीय पुरस्काराने प्रा.निर्मला शेवाळे सन्मानित

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

प्रा. निर्मला शेवाळे यांना सोलापुर येथील ” गावगाडा ” संस्थेच्या मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेला प्रा.निर्मला शेवाळे लिखित ” करंजमाळ ” या ललित संग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळी प्रा. निर्मला शेवाळे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील लेखकांचा,त्यातही एका स्त्रीचा सन्मान करणारा ” गावगाडा ” पुरस्कार म्हणजे हा ग्रामीण समाजाचा आणि त्या मायमातीचाच झालेला सन्मान आहे.माझ्यासारख्या स्त्रीसाठी हा सन्मान खूपच विशेष असा आहे. मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या रहिवासी असणाऱ्या निर्मला शेवाळे या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्या तरी त्यांची शेतीमातीशी आसलेली नाळ आजही जुळलेली आहे.गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामीण जीवनाचे अस्सल शब्दचित्रण त्यांच्या करंजमाळ या ललित संग्रहात आहे.पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या भारतरत्न लता मंगेशकर सभागृहात आयोजित १४वा गावगाडा पुरस्कार कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र झुंजारराव होते.प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक विश्वास मोरे,अभिरुची पब्लिकेशनच्या वैजयंती जाधव, मराठी विभाग प्रमुख डॉ निशा भंडारे, गावगाडा संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले,निमंत्रक बाबुराव इंगळे,दिनेश आदलिंग, दत्तात्रय पिसाळ,जनार्दन भोसले राजश्री पाटील,ज्ञानेश जाधव, रविंद्र रायकर,गायत्री क्षीरसागर आदी उपस्थित होते.
गावगाडा पुरस्कार मिळाल्याबद्दल शेवाळे कुटुंब आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!