शिरोली येथील मार्बल लाईनला कारची दुचाकीस धडक बसून तरूण ठार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर पुलाची शिरोली सांगली फाटा येथील मार्बल लाईनला भरधाव कारची दुचाकीस जोराची धडक बसून झालेल्या अपघातात भुये येथील तरूण जागीच ठार हा अपघात आज मंगळवारी दुपारी झाला.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील मयत तरूणाचे नाव सुरज संजय पाटील ( वय २७ रा. भुये ता. करवीर ) असे असून सुरजच्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. जुनी फरशी काढून नवीन मार्बल फरशी बसवायची असल्याने सुरज हा मंगळवारी दुपारी सांगली फाटा येथील मार्बल लाईनला फरशी पाहण्यासाठी गेला होता.

 

 

फरशी पाहून घरी जात असताना सांगलीहून कोल्हापूरकडे येत असलेल्या इर्टीगा कार क्रमांक एम एच १७ बी व्ही ५३२८ ने सुरज याच्या ज्यूपिटर गाडी क्रमांक एम एच ०९ डी डब्ल्यू ९११५ ला जोराची धडक दिली . त्यात त्याचा मृत्यू झाला . सुरजचे शिक्षण बीएससी केमिस्ट्री झाल्याने तो गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका फौंड्रीत काम करत होता . सुरजला एक मोठा भाऊ असुन तो मेकॅनिक इंजिनियर असून त्याला इंदोर येथील कंपनीतून तिन दिवसात कामावर हजर होण्याचा काॅल आल्याने तो मागील आठवड्यात इंदोरला गेला आहे.

 

 

सुरजचे वडील हे डॉक्टर होते त्यांचा सहा महिन्यापूर्वी आजारपणाने मयत झाले आहे. सुरजच्या कुटुंबात आई , मोठा भाऊ व सुरज असे तिघे राहत होते.तरूण मुलाच्या अपघाती मृत्यूची माहितीने आईला मानसिक धक्का बसून नये यासाठी रात्री उशीरापर्यंत गावकऱ्यांनी दक्षता घेतली होती.या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

error: Content is protected !!