वाढत्या सिमेंटच्या काँक्रिटीकरणामुळे अनेक पशुपक्षी दुर्मिळ होत चालले आहेत दररोज अंगणात बसणारे पक्षी दिसेनासे झाले आहेत त्यातच वाढत्या उष्माघातामुळे पशुपक्ष्यांच्या राहण्याची आणि पाण्याची गंभीर समस्या बनली आहे. यासाठी श्री पद्माराजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ए ए मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक अविनाश माने आणि विनोदकुमार मगदूम यांच्या संकल्पनेतून पशुपक्ष्याना राहण्यासाठी घरट्याची आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला विभागाच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तु पासून सुंदर अशी घरटी तयार केली. विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात झाडावरती आणि सावलीच्या ठिकाणी अशी घरटी लावली आहेत. तसेच विद्यार्थिनी घराच्या परिसरात आणि अंगणात सुद्धा कृत्रिम घरटी तसेच आणि अंगणात ठेवावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए ए मुल्ला, व्ही ए गवंडी, ए व्ही जाधव एस एम माने एस एस प्रधान तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.