शंभर दिवस क्षयरोग मुक्त हालोंडी उपकेंद्राची रिल्स प्रथम,५ ग्रामपंचायती १००% क्षयरोग मुक्त

Spread the love

 

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली ता. हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत राबविण्यात आलेल्या क्षयरोग (टिबी) मुक्त अभियानांतर्गत पाच गावे शंभर टक्के टिबी मुक्त झाली आहेत. यामध्ये हालोंडी उपकेंद्राने तीन मिनिटाचे रिल तयार केले होते. त्यामध्ये स्थानिक नागरिक व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे.

 

 

सोमवार २४ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस. यांच्या हस्ते त्याटिमचा सत्कार करण्यात येणार आहे पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येण्प्रया सर्व गावात वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अॅन्डुस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत हालोंडी उपकेंद्राच्या आरोग्य विभागाने टिबी मुक्त अभियानाचें तीन मिनिटाचे एक रिल तयार केले होते. ते रिल सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आले होते. या अभियानांतर्गत आपली संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतली. या रिलमुळे हालोंडी तसेच मौजे वडगाव, संभापूर व कासारवाडी हि पाच गावे शंभर टक्के टिबी मुक्त झाली आहेत.

या आरोग्य पथकास वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अॅन्ड्युज, डॉ. सोनल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापिका कल्पना जाधव, विकास इंगोले, निर्माता प्रणिश पाटील आदींचे सहकार्य लाभले.

या रिलमध्ये सुमैय्या अपराज,102 रुग्णवाहिका चालक सरदार पाटील, सुजाता देसाई, ललिता पाटील, वनिता माने, संजय डी, शैला वांगणे, माणिक बागणे, स्वराली पाटील, रिया नाईक, सलोनी कार्डाळकर, साईराज सागर, सुमा वांगणे सुमन पाटील आदींनी भूमिका बजावली.

error: Content is protected !!