कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकलंगले येथे घोडके इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीचे उद्घाटन वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.घोडके इलेक्ट्रॉनिक व मोबाईल शॉपीने व्यवसायात उत्तम भरारी घेतली असून त्यांच्या तिसऱ्या शाखेचे कुंभोज येथे उद्घाटन झाले आहे तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे अशी मत मिळाली अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
घोडके इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीचे उद्घाटन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ,महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी,छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक अमित साजनकर सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे, अशोक चौगुले अनिल कोरे ,सुजाता शेंडगे, महावीर चौगुले ,श्रीकांत माळी ,जब्बु भोकरे, रविराज जाधव, अभिनंदन चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार वसंत घोडके व सतिश बामणे परिवाराच्या वतीने करण्यात आला.