चार चाकीची मोटरसायकल धडक,महाविद्यालयीन तरुण जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

भादोले ते आष्टा मार्गावरून सांगलीच्या जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकल वरील चिकोडी तालुक्यातील चंदुर टेक इथला वीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी नंदराज मारुती पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच गावच्या सतरा वर्षीय सुशांत तात्यासाहेब पाटील हा

गंभीर जखमी झाला.हा अपघात भादोले आष्टा रोडवर भादोले गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री बारा वाजता घडला.या अपघाताची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात अजूनही झालेली नाही.

चिकोडी तालुक्यातील चंदुर टेक इथले नंदराज मारुती पाटील आणि सुशांत तात्यासाहेब पाटील हे दोघेजण सांगली इथं एका महाविद्यालयात शिकत आहेत. ते दोघेही मोटरसायकल क्रमांक mh 09 एक्स 2894 वरून तळसंदे इथं आले होते. इथले काम आटोपून ते रात्री बाराच्या दरम्यान सांगलीकडे निघाले होते. भादोले गाव ओलांडून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर पेठ वडगाव ते आष्ट्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मारुती ब्रिजा MH14 GN 5353 आणि मोटर सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.यामध्ये मोटरसायकल वरील दोघेजण उडून रस्त्यावर पडले.तर ही कार सुमारे 500 ते 700 फूट अंतर झोकांड्या खात तानाजी धोंडीराम माने यांच्या शेतात जाऊन पडली.या कारचे वेग इतका प्रचंड होता की पुढचे दोन्ही एअरबॅग ओपन झाले असून चारी चाके पूर्णपणे तुटलेले आहेत.या कार मध्ये चार जण होते ते मद्य प्राशन करून गाडी चालवत होते.अपघाताच्या आवाजाने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोटरसायकल वरील दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.पण यातील नंदराज मारुती पाटील हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.तर जखमी सुशांत तात्यासाहेब पाटील याच्यावर वेळेत उपचार होत नसल्याने नातेवाईकांनी रात्रीच त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघाताची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात अजून झालेली नाही.

error: Content is protected !!