प्लॅस्टिक वायू प्रदूषण शिरोळमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक – शहाजी गावडे

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात शिरोळ नगरपरिषद आणि आरोग्य विभागाकडून अधिक गंभीरता घेण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे शिरोळ शहराध्यक्ष शहाजी गावडे यांनी केली आहे.घनकचरा प्रकल्प दसरा चौक नदिवेस भागामध्ये आहे, परंतु तो बंधिस्त नसल्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते.या प्रकल्पाच्या परिसरात मटण मार्केट आणि हॉटेल्समधून आलेले मांस खाण्यासाठी भटकी कुत्री फिरत असतात.यामुळे पाळीव प्राणी,लहान मुले यांना चावा घेऊन जखमी करण्याच्या घटनाही घडत आहेत. यासोबतच कचरा डेपोत वारंवार आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे.यामुळे वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना अत्यधिक त्रास होतो आहे.प्लॅस्टिक वायू प्रदूषण शिरोळमधील सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.जर शिरोळ नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने लवकरच या गंभीर समस्यांवर उपाययोजना केली नाही, तर रयत क्रांती संघटना उग्र स्वरूपाचे जनआंदोलन उचलण्यास तयार आहे.याची सर्वस्वी जबाबदारी शिरोळ नगरपरिषद आणि आरोग्य विभागाची असेल असा इशारा शहाजी गावडे यांनी दिला आहे.दरम्यान शिरोळ शहरातील नागरिकांना आरोग्यदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ही स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!