शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी शिरोळ येथील स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान राजमाने-माने परिवार व मित्रमंडळी यांच्यावतीने पालकमंत्री आबिटकर यांचा जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला.
राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कष्ट आणि जिद्द यांद्वारे केलेल्या कामाची माहिती सुहास राजमाने यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर सादर केली. राजमाने यांनी आपले कार्य प्रामाणिकपणे, निर्धाराने आणि समाजाच्या हितासाठी केले आहे.त्यांनी आपल्या कामामध्ये नेहमीच समाजाची सेवा आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित केले आहे.यावेळी,सुहास राजमाने यांनी सांगितले की,”समाजात बदल घडवण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात,तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी एकजुटीने काम करणे महत्त्वाचे आहे.”