पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटर सायकल स्वरास पाठीमागून जोराची धडक दिल्याने सांगलीतील विश्रामबाग मध्ये राहणारे 45 वर्षीय मोटर सायकल स्वार वैभव वसंत पाटील यांचा मृत्यू झाला.अपघात आज दुपारी दीड वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली इथं महाडिक बंगल्यासमोर झाला.
सांगली शहरातील विश्रामबाग मध्ये राहणारे 45 वर्षीय वैभव वसंत पाटील हे आपल्या मोटरसायकल क्रमांक mh 10 dc 8744 वरून दुपारी दीडच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ट्रक चालक जावेद मुनाफ तकिलदार हे ट्रक क्रमांक mh 50 1935 हा घेऊन भरधाव निघाले होते. या ट्रक ने मोटरसायकल स्वरास पाठीमागून जोराची धडक दिल्याने वैभव पाटील रस्त्यावर आपटले त्यांच्या डोक्याला व तोंडाला दुखापत झाली. तर एका पायावरून याच ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी वैभव पाटील यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. बे जबाबदारपणे वाहन चालवल्याने ट्रकचालक जावेद तहसीलदार वय 71 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा अपघात पुलाची शिरोली इथल्या महाडिक बंगल्यासमोर झाला.या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.