कत्तलीसाठी जाणारी जनावरे,बोलेरो पिकअप पेठवडगाव पोलिस ठाण्यातून चोरीस – सुरेश यादव

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

 

मिरज कत्तलीसाठी जात असताना वठार येथे गोरक्षकांनी एक बोलेरो पिकअप पकडली.ही घटना 10 मार्च रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास घडली. गोरक्षकांनी घटनास्थळी पोलिसांना तात्काळ कळवले, त्यानंतर पेठ वडगाव पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली.बोलेरो पिकअपमध्ये एक देशी गाय आणि तीन जर्सी गायी होत्या. गोरक्षकांनी व पोलिसांच्या सहकार्याने गाडी पोलीस स्टेशनला नेली.तथापि,

पोलिसांनी सकाळी 10 वाजता गुन्हा नोंद करण्याची सूचना दिली.मात्र,सकाळी साडेदहा वाजता गोरक्षक पोलिस स्टेशनवर गेले असता,पोलिसांनी सदर गाडी सोडून दिली होती.गाडी सोडण्याबाबत गोरक्षकांनी शंका व्यक्त केली असून, ज्या पोलिसांनी गाडीला सोडले त्या पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे सुरेश यादव यांनी आज शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी दीड वाजता केली आहे.दरम्यान पोलिसांच्या ताब्यातील जनावरे व बोलेरो पिकप गाडी चोरीस गेले असल्याची फिर्याद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दाखल असल्याचे समोर आल्याने सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दोशींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाईल,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!