पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे बुधवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा आवमान करणाऱ्या फोटोवरून हिंदु मुस्लिम वाद निर्माण झाला होता त्या अनुशंगाने दोन्ही समाजाची शांतता बैठकीचे आयोजन केले असता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.फेसबुकवर टिपू सुलतान व छत्रपती संभाजी महाराज यांच्या फोटोमध्ये तपावत निर्माण करून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा मजकूर आलेल्या पोस्टला दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या मिस्त्रीने लाईक व अटॅचमेंट करून अवमान केल्याप्रकरणी स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक होऊन दोघांना मारहाण केल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला.यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते निलेश शिंदे,श्रीकांत कदम,राकेश घालवाडे या तिघांवर मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.तर मुस्लिम समाजातील तरूणांवर किरकोळ एनसी दाखल केल्याने यावेळी पोलिसानी प्रथमदर्शनी तपासाचा विचार न करता हिंदुत्ववादी कार्यकर्त्याना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आला.त्यामुळे शिरोली पोलिसांनी आज सायंकाळी ४ वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले असता या बैठकीस हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकून पोलिस प्रशासनाने एकतर्फी गुन्हे नोंद करत कार्यकर्त्यांना मारहाण करून हिंदूच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार केल्याने या बैठकीवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे,तंटिमुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील,राष्ट्रीय सेवा युवक संघटनाअध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच अनिल शिरोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण,माजी उपसरपंच सुरेश यादव,नितीन चव्हाण, अर्जुन चौगुले,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी दिपक यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौदाडे माजी उपसरपंच अविनाश कोळी,संपत संकपाळ,दिलीप कौंदाडे, उद्योजक व ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी योगेश खवरे,प्रशांत कागले,कुमार पाटील,संदीप पोर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.