होळी साजरी करताना नैसर्गिक रंगाचा वापर करा – सतिश माने

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी 

 

होळी हा केवळ रंगांचा सण नव्हे तर भारताची संस्कृत यांनी रीतीरिवाजाशी जोडलेला हा सण आहे. होळीच्या आगीत अनिष्ट गोष्टी जळून जातात दुःखे नाहीशी होतात आणि रंगांमध्ये भरलेला आनंद जीवनात उतरतो अशी होळीच्या सणाची महती आहे.रंगपंचमीला रंगाचा बेरंग करणाऱ्या व शरीराला हानीकारक ठरणाऱ्या रासायनिक भेसळीच्या रंगाचा सुळसुळाट झाला असल्याने नागरिकांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन हरित सेनेचे संचालक सतीशराव माने यांनी केले.होळी व रंगपंचमी सणाच्या पूर्वसंध्येला होळी व रंगपंचमी कशी साजरी करावी या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विनया जाधव होत्या.

ते पुढे म्हणाले की होळी हा संपूर्ण रंगाचा सण झाला आहे.या दिवशी सर्व जाती-धर्माचे लोक मतभेद विसरून एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने होळी साजरी करतात. होळी नंतर सर्वांना वेद लागते ते रंगपंचमीचे. रंगपंचमीसाठी बाजारात विविध प्रकारचे कृत्रिम रंग विक्रीसाठी आले असून विविध रंगातील पिचकारी दाखल झाल्या आहेत.सप्तरंगांची उधळण करीत रंग एकमेकाला लावून रंगपंचमी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केली जाते. रंगपंचमीत आपला रंग इतरापेक्षा अधिक गडद व्हावा त्वचेवर अधिक काळ टिकवण्यासाठी रंगांमध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो. ऑइलपेंट,सिल्वर कलरचे वार्निश,गिल्ला चेहरा व त्वचेला फासला जातो.त्यामुळे त्वचेवर घातक परिणाम होतो.

 

 

रासायनिक रंगामुळे त्वचा,डोळे, केसांना इजा होण्याच्या घटनांमूळे रंगपंचमीच्या आनंदावर पाणी फिरत आहे. रासायनिक रंगामुळे त्वचा डोळे व केसांना धोका होण्याचा संभव असतो. हा रंग डोळ्यात गेला तर कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. अशा वातावरणात थंड पाणी, पिवडी, गुलाल पावडरचे विविध रंग एकमेकांना उधळताना प्रत्येकाने खबर घेणे गरजेचे आहे. रासायनिक रंग त्वचेवरून लवकर जात नाही तो रंग निगावा म्हणून त्वचा घासून धुऊ नये. रंगपंचमी खेळण्याआधी व खेळल्यानंतर मॉइश्चरसन सनक्रीम किंवा तेल त्वचेवर लावावे. त्यामुळे कोरड्या रंगाने होळी खेळणे आवश्यक आहे.

रंगपंचमी खेळून झाल्यानंतर अनेकांची पावले नदी विहिरीतलावाकडे वळतात काहीजण व्यसन करून पाण्यात उतरतात पाण्याच्या खोलीचा व अंतराचा अंदाज न आल्याने पोहताना दम लागतो. त्यामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असते. शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी सणाचे गांभीर्ये ओळखून होळीचा व रंगपंचमीचा सण साजरा करावा असे आवाहन सतीशराव माने यांनी केले.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका विनया जाधव यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक सदाशिव तिगणे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी तर शेवटी आभार सच्चिदानंद जंगम यांनी मानले.

या कार्यक्रमास सुनिता कुलकर्णी, बाबासाहेब भुजूगडे, प्रसन्न कुलकर्णी, राहुल जंगम, गजानन केरीपाळे, विजय शहापुरे, धनंजय काळे, उत्तम पाटील, हेमलता माळी, शोभा बोंगाळे, सुधाकर कांबळे, जितेंद्र कुलकर्णी, सोमनाथ जंगम या मान्यवरासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!