पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विलास नगर शिरोली पुलाची या प्रशाले मध्ये दिनांक 08 मार्च जागतिक महिला दिन व माननीय संस्थापक एस.एन.पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष महेशकुमार पाटील यांनी संस्थेच्या नुतन नामकरणाची श्री सदाशिव नारायण पाटील प्राथमिक विद्या मंदिर विलास नगर एम आय डी सी शिरोली पु अशी घोषणा केली.संस्थापक एस एन पाटील साहेब यांचा ७८ वा वाढदिवस विद्यार्थ्यांचे समवेत साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिला दिनानिमित्त पाककला, संगीत खुर्ची, सुईदोरा ओवणे,उखाणे या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या महिलांचा संस्था सचिव सौ माधवी पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे नुतन अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार पाटील ,उपाध्यक्ष महेश कुमार पाटील, संस्था सचिव सौ माधवी पाटील खजाणिस अमर निळकंठ संचालिका सौ आरतीताई पाटील व सौ प्रतिभाताई पाटील उपमुख्याध्यापिका सौ एस.जी.पाटील माध्यमिक मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री डोईफोडे उपस्थित होते.महिला दिन या कार्यक्रमाचे नियोजन सौ वंदना पाटील सौ प्रियांका पाटील सौ अनिता मेडसिंग सौ स्नेहल कोळी यांनी केले महिला दिनानिमित्त सौ अर्चना काळे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन लहू श्रावस्ती यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप कुंडलिक जाधव यांनी केला.