दत्तवाड / प्रतिनिधी
शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी.या उद्देश्याने जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता ४थी व इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांची बॅ.बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी शिरोळ तालुक्यातील पद्माराजे विद्यालय शिरोळ येथील परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावरील कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी सौ.रत्नप्रभा दबडे उपस्थित होत्या.वर्षभर विद्यार्थी व वर्गशिक्षकांनी मेहनत घेवून तयारी केलेली होती. दरम्यान निवड परीक्षेतील उच्चतम गुण मिळविणाऱ्या परीक्षार्थ्यांचा सन्मान जिल्हा स्तरावर केला जाणार आहे.
इयत्ता चौथीच्या केंद्रांवर मराठी माध्यम २०५ व ३९उर्दू माध्यम असे एकूण २४४ परीक्षार्थ्यांनी तर इयत्ता सातवीच्या केंद्रांवर १०२ मराठी माध्यम व २६ उर्दू माध्यम असे एकूण १२८ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली.
गटविकास अधिकारी नारायण घोलप,गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी,परीक्षा विभागप्रमुख अनिल ओमासे,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत, एन.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, इयत्ता ७ वी केंद्र संचालक देवदत्त नारायण कुंभार,४ थीचे केंद्र संचालक शहानुर वहाब कमाल शहा,परीक्षा सहाय्यक सुरेश पाणदारे,अण्णा मुंडे,यशवंत पेठे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख,केंद्र समन्वयक,कार्यालयीन स्टाफ, मुख्याध्यापक,शिक्षकवृंदांचे प्रज्ञाशोध निवड परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले.
चौकट
उर्दू विद्या मंदिर अ.लाट शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु.सना फारुख मुल्ला हिचा उजवा हात फ्रॅक्चर होवून तिने लेखनिकाच्या सहाय्याने पद्माराजे विद्यालय शिरोळ येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.
चौकट
जिल्हा परिषदेच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर परीक्षेतील बैठक व्यवस्था लोकसेवा आयोगाच्या धर्तीनुसार बेंचवर स्टीकरने नंबर चिकटविलेली होती.एक वेगळाच अनुभव परीक्षार्थांना आला.जिल्हयातील पहिलाच प्रयोग शिरोळ तालुक्यातील पद्माराजे विद्यालयातील केंद्रावर करण्यात आला.