दुर्गामाता महिला मंडळाकडून आई वृध्दाश्रमात महिला दिन साजरा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ मधील दुर्गामाता महिला मंडळाने यंदाचा जागतिक महिला दिन निमशिरगाव येथील आई वृध्दाश्रमातील अनाथ ,निराधार वृध्द मातांच्या सोबत साजरा केला.यावेळी दुर्गामाता महिला मंडळाने आई वृध्दाश्रमातील सर्व आज्यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारून वृध्दाश्रम पर्यंतचा त्यांचा प्रवास जाणुन घेतला. त्यांनी वृध्दाश्रमामध्येच प्रिती भोजनाचे नियोजन करून सर्व महिला सदस्यांनी जेवण बनविले.‌ आपल्या हातांनी सर्व आज्यांना जेऊ घातले. यावेळी वृध्दाश्रमातील आजी -आजोबांनी मनसोक्त भोजनाचा आस्वाद घेतला.यावेळी आज्यांना साड्याचे वाटपही करण्यात आले.
दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विवीध सामाजिक उपक्रमाने साजरे होतात. यावेळी त्यांनी आई वृध्दाश्रम निमशिरगांव येथे अनाथ , निराधार वृध्द मातांच्या सोबत जागतिक महिला दिन साजरा करत त्यांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न केला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्रच कौतुक होत आहे.
यावेळी दुर्गामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ विजया राजेंद्र दाभाडे,उपाध्यक्षा संगिता दगडू माने यांच्यासह सौ यशोमति पाटील, सौ आनुश्री माने ,सौ गीतांजली साळुंखे ,श्रीमती शितल चव्हाण, श्रीमती पुनम माने. सौ गिता पाटील,सौ शोभा मराठे आदि महिला उपस्थित होत्या. वृद्धाश्रम संस्थेच्या सचिव रेश्मा भोसले , संचालिका हेमा भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!