घोसरवाड / प्रतिनिधी
घोसरवाड ता शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या नुतन उपसरपंचपदी सौ.सरोजनी विजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव साबळे होते.मावळते उपसरपंच लक्ष्मण नाईकवाडे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपताच राजीनामा दिला होता.त्यामुळे नुतन उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक झाली.या बैठकीत उपसरपंच पदासाठी सरोजनी विजय चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडीचे अध्यक्ष तथा सरपंच साहेबराव साबळे यांनी जाहीर केले.निवडीनंतर सौ. सरोजनी विजय चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण,मावळते उपसरपंच लक्ष्मणराव नाईकवाडे,पोलिस पाटील अजित खोत,संजय चव्हाण, विजय चव्हाण,नाना चव्हाण,राजु चव्हाण यांचेसह ग्रा.प. सदस्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.