नृसिंहवाडीत ‘गावची लेक लाडकी’ योजने अंतर्गत मुलगीच्या जन्मानंतर मिळणार १० हजार रुपये – सरपंच चित्रा सुतार

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ” गावची लेक लाडकी ” या योजनेला सुरूवात केली आहे. यामध्ये नृसिंहवाडी मधील जन्म घेतलेल्या मुलीच्या नावे ग्रामपंचायतीच्या वतीने दहा हजार रुपये ठेव पावती देण्यात येणार आहे. अशी घोषणा सरपंच चित्रा सुतार, माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केली.जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या धनश्री जगदाळे, माजी सरपंच विनिता पुजारी, माजी सरपंच अरूधंती जगदाळे, डॉ. पल्लवी आणुजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आणि गुणवंताचा सत्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाच्या लेक लाडकी योजनेपासून प्रेरणा घेऊन नृसिंहवाडी येथील जन्म येणाऱ्या मुलीला दहा हजार रुपये ठेव पावती स्वरूपात ग्रामपंचायत युवतीने देण्यात येणार आहेत. अशी घोषणा सरपंच चित्रा सुतार, माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केली. त्याला टाळ्याच्या गजरात महिलाने पाठिंबा दिला.

 

यावेळी महालक्ष्मी सरस महिला म्हणून लिला खोचरे, ज्योती मोरे, प्रियांका साळुंखे तर लखपती दिदीचे सुजाता साळुंखे, कविता मराठे, सुरेखा कदम, अदिका कांबळे यांच्या सह महिलांचा सत्कार करण्यात आला. बँक सखी म्हणून आश्विनी सोलापूरे, सी. आर. पी प्रमुख प्रियांका होवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पल्लवी आणुजे यांनी महिलांनी रोजच्या दिनचर्या तून स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यायाम आणि संतुलित आहार जीवनामध्ये महत्वाचा असल्याचे सांगितले.

 

 

 

 

अरूधंती जगदाळे यांनी महिलांनी चूल आणि मूल यामध्ये न अडकता आपल्या कला गुणांना वाव द्यावा. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीचे सोने करावे असे आवाहन केले. यावेळी ग्रामसेवक एस. पी. कांबळे यांनी महिला गावसभेचे महत्व सांगून शासनाच्या योजनांची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी निकम, अनिल केरीपाळे, शालेय समिती उपाध्यक्ष कांची चंद्रस, सदस्य गीता मोरे , नेहा माने, वनिता शिंदे, रेश्मी केसरकर यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन स्वाती विभूते दत्ता चव्हाण यांनी केले तर आभार प्रियांका होवाळे यांनी मानले.

error: Content is protected !!