सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करा शिवसेना शिंदे गटाची मागणी 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील मज्जाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी. अशी मागणी करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शिरोळमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

 

 

 

शिवसेना कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, शिरोळ तालुकाप्रमुख उदय झुटाळ,शिवसेना महिला आघाडीच्या माधुरी टाकारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज शिरोळमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला.संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्वच आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड यांचा विरोधात निदर्शने करण्यात आली. कराड यांच्या पुतळ्यास जोडेमार आंदोलन करून पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आंदोलकांकडून पुतळा हिसकावून घेतला.यावेळी शिवसेनेचे प्रा चंद्रकांत मोरे, सतीश मलमे, उदय झुटाळ, राकेश खोद्रें, माधुरी टाकारे यांनी मनोगत व्यक्त करत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.यावेळी शिवसेनेच्या हेमा जाधव, अर्चना भोजणे, छायाताई सूर्यवंशी, स्वाती भापकर, दिपाली चंदूगडे, प्रियंका धुमाळे, रोहिणी सांबरेकर, संध्या हजारे, शोभा कोळी, अशाराणी काळे, सारिका पडळकर, गायत्री गोटखिंडे, सीमा लंगोटे, आकाश शिंगाडे, हरिदास पाटील, सचिन डोंगरे, सुरज भोसले, रतन पडियार, सिद्धाराम घोरपडे, दिग्विजय चव्हाण, अनिल कोळी, वैभव तोडकर, सोमेश गवळी, जुगल गावडे, सुरज माळी, समीर मुल्ला, विनोद माळी, समाधान काकडे, सचिन पाटील, पियुष साळोखे, अरुण माने संभाजी थोरात, सदाशिव शिंदे, बाळासो पाटील, प्रवीण दळवी, सुनील घारे, शुभम मलमे, रोहित भिसे, सुशांत मलमे ओंकार मयेकर, रवींद्र संकपाळ, रमेश कलगुटगी, आदित्य शिंदे, अथर्व केकले, दीपक नंदीवाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!