पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिये ता करवीर येथील नागपूर रत्नागिरी रोडवरील ब्रिजच्या कामाचे दिड लाख रूपयाचे लोखंडी सेट्रींग साहित्य अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने अज्ञात व्यक्ती विरूद्ध शिरोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानुसार शिरोली पोलिस पेट्रोलिंग करत असताना काही संशयित आढळून आल्यावर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबली दिली असता त्याना कोर्टात हजर केल्याने कोर्टाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .नव्याने सुरू असलेल्या नागपूर रत्नागिरी रोडवरील शिये गावच्या हद्दीत मेघा इजिनिअर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लीमीटेड कंपनीमार्फेत रोडवर ब्रिज बनवण्याचे काम चालू असून त्यासाठी लागणारे लोखंडी सेट्रींग साहित्य १,४८,२५० रूपये किमतीचे यामध्ये सेट्रींग प्लेट, हंच प्लेट, पाईप जॅक, यु जॅक, बेस जॅक असे आरोपी संकेश गणपती कदम व.व. २१ रा.पाटील गल्ली माळवाडी शिये, २] प्रणव संभाजी कदम व.व.२० रा. क्रेशर लाईन कोळयाची खडी शिये, ३] हर्षल विश्वास पाटील व.व. २२ रा.पाटील गल्ली माळवाडी शिये, ४] प्रथमेश प्रसाद इंगवले व.व.२२ रा.मराठी शाळेजवळ रामनगर शिये हे चोरलेले साहित्य घेवून जात असल्याची माहिती शिरोली पोलिसाना पेट्रोलिंग करत असताना खबर्याकडून मिळाली त्यानुसा चोरीचे साहित्य घेवून जाणारा टेम्पो आडवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यानी चोरीची कबुली दिली त्यानुसार त्याना कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंडीत चौरे, सचिन पाटील, सुरज सोनुले, सनी गायकवाड यानी केली